Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचे जिम लूक्स आणि एअरपोर्ट लूक्स अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...
मलायकाचा एअरपोर्ट लूक चर्चेत
मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे. यावेळी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton या ब्रँडचं आहे. रिपोर्टनुसार या जॅकेटची किंमत $7,450 एवढी म्हणजेच जवळपास 4,09,626.67 एवढी आहे. तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे.
मलायकानं ब्लॅक कलरची स्टार शेप प्रिंट असणारी कॅप देखील घातली होती. या कॅपची किंमत जवळपास 30 हजारपेक्षा जास्त आहे.
पाहा मलायकाचा लूक
सोशल मीडियावर मलायकाची हवा
मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.
वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायकाला छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Malaika Arora: 'अपघातानंतर डोळे उघडताच...'; मलायकानं सांगितला थरारक अनुभव