Malaika Arora : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरच्या वाढदिवसावर विशेष लक्ष आहे. त्यातच त्याच्या वाढदिवसाला मलायकाची अनुपस्थिति देखील चर्चेचा विषय ठरली. पण या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते मलायका अरोरा हिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायका काय पोस्ट करणार याची उत्सुकता खरंतर सगळ्यांना होती. पण आता तिच्या या पोस्टमुळे पुन्हा काही गोष्टी चर्चेत आल्या आहेत.
मलायकाच्या या पोस्टमुळे तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपचं कारण सगळ्यांसमोर आल्याचं म्हटलं जातंय. तसेच अर्जुनने मलायकाचा विश्वासघात केला असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. अर्जुन कपूर हा त्याचा 39 चा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचनिमित्ताने अर्जुनच्या घरीही जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. पण विशेष लक्ष वेधून घेतलं ते मलायकाच्या अनुपस्थितीने. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.
मलायकाची पोस्ट नेमकी काय?
मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, मला तेच लोकं आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करुन आणि पाठ फिरवल्यानंतरही विश्वास ठेवू शकते. तिच्या या पोस्टमुळे अर्जुनने तिचा विश्वासघात तर केला नाही ना असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर झाले वेगळे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही यावर मौन बाळगणं पसंत केलं आहे. कारण त्यांना असं वाटत नाही की, त्यांच्या नात्यावर कोणतीही टीका-टीप्पणी केलेली नकोय. सूत्रांनी पुढेही म्हटलं की, त्याचं नातं बराच काळ टिकलं, पण आता ते संपलं आहे.
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जात आहे. मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अर्जुनने 'इश्कजादे' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.