Richa Chadha on Deepika Padukone : कल्कि सिनेमामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या बरीच चर्चेत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) गुडन्यूज दिली. त्यामुळे दीपिका सध्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बेबीबंपसह दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात दीपिकाची हजेरी ही सध्या बरीच ट्रोलिंगचा विषय ठरतोय. त्यातच कल्कि सिनेमाच्या प्री लॉन्च इव्हेंटमुळेही दीपिकाला बरंच ट्रोल करण्यात आलं. त्या सगळ्यांना आता अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) हीने सडेतोड उत्तर दिलं आहे. 


अभिनेत्री रिचा चढ्ढा देखील लवकरच आई होणार आहे. तिनेही काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर ही गुडन्यूज दिली होती. त्यामुळे दीपिकाला प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाने चांगलच सुनावलं.  सध्या रिचाच्या या कमेंटची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. 


रिचाची कमेंट नेमकी काय? 


दीपिकाला ट्रोल केल्यानंतर रिचाने तिच्या एक पोस्टवर कमेंट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, No Uterus, No Gyaan म्हणजेच गर्भायश नाही तर ज्ञान देऊ नका. सध्या सोशल मीडियावर रिचाच्या या कमेंटची जोरदार चर्चा सुरु आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये रिचा आणि अली फजलनेही सोशल मीडियावर पोस्ट करत गुडन्यूज दिली होती. त्यानंतर हे दोघेही आता लवकरच आई बाबा होणार आहेत.








दीपिकाचं ट्रोलिंग


प्रेग्नंसीदरम्यान हिल्स घातले म्हणून अभिनेत्री दीपिका पादुकोण ट्रोल झाली. त्यानंतर एका सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरनेही त्यावर व्हिडीओ करत दीपिकाची बाजू घेतली. त्यामध्ये तिने म्हटलं होतं की, तिला लहान नाही की जिला प्रत्येक गोष्ट सांगावी लागेल. ती स्वत:चे निर्णय स्वत:घेऊ शकते. आणि तिला इतर कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.                          






ही बातमी वाचा : 


Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...