Indian 2 Hindustani 2 Trailer : दिग्गज अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'इंडियन 2' चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 28 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या 'इंडियन' (Indian) या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 'इंडियन 2'ची घोषणा केल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. 'इंडियन'मध्ये कमल हासन यांनी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सेनापतीची भूमिका साकारली होती. सेनापतीने भ्रष्ट व्यवस्थेसोबत दोन हात केले होते. 'इंडियन 2'च्या माध्यमातून कमल हासन यांनी जोरदार कमबॅक केले आहे. 


'इंडियन 2'च्या ट्रेलरमध्ये काय?


'इंडियन 2'चा ट्रेलर व्हॉईस ओव्हरने सुरू होतो, ज्यामध्ये देशातील परिस्थिती सांगितली जाते.  हा कसला देश? सुशिक्षितांना काम नाही आणि काम असेल तर पगार नाही. चोर चोरी करत राहणार आणि गुन्हेगारही गुन्हे करतच राहणार. देशाची परिस्थितीबाबत भाष्य करण्यात आले आहे.या ट्रेलरमध्ये  गरीब कसे गरीब होत आहेत, तर श्रीमंत कसे श्रीमंत होत आहेत हे दाखवण्यात आले आहे. भ्रष्टाचारही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील लोकांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा 'इंडियन'ला साद घातली जाते. कमल हासन 'इंडियन' म्हणजेच सेनापतीच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थसोबत बोलताना सेनापती देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असल्याचे सांगतात. 


12 जुलै रोजी रिलीज होणार 'इंडियन -2' 


'इंडियन -2' चा ट्रेलर धमाकेदार आहे. कमल हासन सेनापतीच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपली कमाल दाखवण्यास सज्ज झाले आहेत. वयस्कर असलेले सेनापती  खतरनाक स्टंट करताना दिसणार आहेत. 'इंडियन -2' च्या ट्रेलरवर चाहते खूश झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवेल असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. 



'इंडियन -2' मध्ये कोणते कलाकार... 


'इंडियन -2' मध्ये कमल हासन यांच्याशिवाय सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, प्रिया भवनानी शंकर, ब्रह्मानंदम आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या रिलीजची डेट या आधी पुढे ढकलण्यात आली होती. आता 'इंडियन -2' हा 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे. 


पाहा ट्रेलर : Hindustani 2 - Official Trailer | Kamal Haasan | Shankar | Anirudh | Siddharth, Rakul Preet