Arjun Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत सोसल मीडियावर चर्चा सुरु आहे. मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता अर्जुन हा भडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अर्जुननं अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे. 


अर्जुनची पोस्ट


एका वृत्तसंस्थेच्या आर्टिकलचा स्क्रिनशॉर्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करुन अर्जुननं पोस्टमध्ये लिहिलं, 'हे पत्रकार नियमितपणे असे आर्टिक्स लिहितात आणि अशा खोट्या गॉस्प्स बातम्या पसरवतात. आम्ही याकडे दुर्लक्ष करतो. पण या बातम्या एवढ्या पसरतात की लोकांना त्या खऱ्या वाटतात. त्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचे धाडस करू नका.'



मलायका आणि अर्जुन हे गेली चार वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मलायका ही नेहमी ट्रोलर्सला उत्तरं देत असते. 






'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची  विशेष पसंती मिळाली. अर्जुनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  तर मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Malaika Arora:  मलायकानं दिला होकार, पण कोणाला? पोस्ट चर्चेत