Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा (Malaika Arora Father Death) यांचे निधन झाले आहे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते आहे. अनिल यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 


मलायका अरोरा (Malaika Arora) व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने फार कमी चित्रपटात काम केले आहे. मात्र मलायकाचे चित्रपटामधील अनेक आयटम साँग हिट झाले. आता मलायका आयटम साँग करतानाही दिसत नाही, तरीही तिला कशाचीही कमतरता नाही. चित्रपट न करताही ती करोडोंची कमाई करते. 


मलायका अरोरा किती कोटींची मालकीण?


मलायक अरोरा सध्या चित्रपटात काम करताना दिसत नाही. मात्र अनेक कार्यक्रमात मलायका परीक्षक म्हणून काम करते. या कामासाठी तिला मोठी रक्कम दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोराची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये इतकी आहे. मलायका कोणत्याही चित्रपटातील आयटम साँगसाठी दीड कोटी रुपये घेते. तर टीव्ही शो जज करण्यासाठी ती एका एपिसोडसाठी 6 ते 8 लाख रुपये मानधन घेते. मलायका तिची बहुतेक कमाई योगा स्टुडिओमधून करते. या व्यतिरिक्त, तिला अनेक ब्रँड्सची जाहीरात मिळाली आहे. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत मलायकाच्या संपत्ती मोठी वाढ झाली आहे.  


पोटगी म्हणून किती रुपये मिळाले?


मलायका अरोराचे पहिले लग्न अरबाज खानसोबत झाले होते. मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये विवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. 2016 मध्ये मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाबद्दल सांगून सर्वांनाच धक्का बसला होता. घटस्फोटानंतर मलायका अरबाजचे घर सोडून वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. जिथे ती अजूनही राहते. 2017 मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता. घटस्फोटानंतर मलाइकाला अरबाजकडून 15 कोटींची पोटगी मिळाली.


मलायकाच्या वडीलांची आत्महत्या-


मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही.  मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


संबंधित बातमी:


Malaika Arora Father Death : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट