Continues below advertisement

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमरस डान्स क्वीन मल्लाईका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नवीन ‘Poison Baby Song’ ने सोशल मीडियावर धमाका केल्याचं दिसतंय. 51 वय असलं तरी मलाईकाने ज्या पद्धतीने डान्स केला आहे तिचं कौतुकही सर्वत्र केलं जात आहे. असं असलं तरी तिच्या मुलाला मात्र हा डान्सचा अंदाज आवडत नाही. मलाईका अरोराने स्वतः ही माहिती दिली.

मल्लाईकाने आतापर्यंत छैयाँ छैयाँ, मुन्नी बदनाम हुई, माही वे, गुर नाल इश्क मिठा यांसारखे अनेक सुपरहिट आयटम साँग्ज केले आहेत. तिच्या या डान्सवर तिचे फॅन फिदा आहेत. मात्र मलाईका ज्या पद्धतीने डान्स करते ते तिचा मुलगा अरहान खानला (Arhaan Khan) मात्र मुलाला आवडत नाही.

Continues below advertisement

Arhaan Khan On Malaika Arora Dance : अरहान खान जबरदस्त डान्सर

सध्या मलाईका अरोरा आणि रश्मिका मंदाना यांचा Poison Baby गाण्यावरचा डान्स भलताच चर्चेत आहे. याच गाण्याच्या संबंधित एका इव्हेंटमध्ये बोलताना मलाईका म्हणाली की, “अरहान एक जबरदस्त डान्सर आहे. देवाचे आभार मानते की त्याच्यात माझे डान्सिंग जीन्स आहेत. तो खूप मस्त डान्स करतो.”

मलाईकाने पुढे सांगितले की अरहानला तिचं प्रसिद्ध गाणं 'मुन्नी बदनाम हुई' खूप आवडतं. त्या गाण्यावरच तो वारंवार नवीन डान्स स्टेप्स शिकतो. 'चल आई, आपण एकत्र नाचू या' असं म्हणत तो मलाईकासोबत नाचतो. पण नंतर तो दिवसभर तिच्या डान्स स्टाईलची खिल्ली उडवतो. 'आई, तू असा डान्स करू शकत नाहीत' अशा शब्दात अरहान आपल्या डान्स स्टाईलची खिल्ली उडवतो असं मलाईकाने सांगितलं.

Poison Baby Song : मलाईकाचा डान्स चर्चेत

मल्लाईकाने सांगितलं, “सुमारे एक वर्षानंतर मला पुन्हा अशा आयटम साँगवर नाचायला मिळालं. या गाण्याची कोरिओग्राफी, मूव्ह्ज आणि एक्सप्रेशन कमालीचे आहेत. मला हा परफॉर्मन्स थरारक आणि सुंदर बनवायचा होता.”

Thama Movie Release Date : थामा’ चित्रपट 21 ऑक्टोबरला रिलीज

Thama Movie’ मध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांनी केलं आहे. ‘थामा’ 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ही बातमी वाचा: