Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही 51 वर्षांची असली तरी तिच्या फिटनेससमोर 31 वर्षांच्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. जिममध्ये वर्कआउट करण्याबरोबरच ती शरीर लवचिक ठेवण्यासाठी नियमितपणे योगाचा सराव करते आणि हेल्दी डाएटही पाळते. मलायका कायमच आपल्या फिटनेसने चाहत्यांना आपली फिटनेस जर्नी शेयर करत असते. नुकतंच मलायकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही योगासनांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Malaika Arora Finess)
फॅन्ससोबत शेअर केला फिटनेस मंत्र
मलायकाने सोशल मीडियावर सहा वेगवेगळी योगासनं दाखवणारे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “6 सौम्य योगासनं, जी केल्यानंतर तुमचं शरीर तुम्हाला थँक यू महिला हे नक्की .” पहिल्या व्हिडीओमध्ये ती ‘कॅट अँड काऊ’ पोज करताना दिसते. या आसनाने पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरातील स्नायू सैल होतात. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती ‘हिप स्ट्रेच’ करताना दिसते, जे पाय, पिंढऱ्या आणि गर्भाशयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
प्रत्येक आसनानं शरीरात सकारात्मक बदल
तिसऱ्या व्हिडीओमध्ये मलायका ‘पप्पी पोज’ करताना दिसते. या आसनामुळे डोके आणि खांद्यातील ताण कमी होतो. संगणकावर दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. योगात याला ‘उत्तान शीशासन’ म्हणतात. चौथ्या व्हिडीओमध्ये ती ‘पिजन फॉरवर्ड पोज’ किंवा ‘कपोतासन’ करताना दिसते. या आसनामुळे शरीरातील लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि पिंढऱ्या मजबूत होतात.
बाकी दोन व्हिडीओंमध्ये मलायका ‘भुजंगासन’ आणि ‘फ्रॉग स्ट्रेच’ करताना दिसते. भुजंगासन पाठीचा कणा, खांदे आणि मान यांच्यासाठी उपयुक्त आहे, तर ‘फ्रॉग स्ट्रेच’ मांड्या, पिंढऱ्या आणि पायांच्या स्नायूंना बळकट करते. मलायकासारखी ही आसनं रोजच्या जीवनात समाविष्ट केल्यास शरीरात जबरदस्त बदल जाणवतात आणि एकूणच आरोग्य सुधारते.
मलायका अरोराचा वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलायका अरोरा लवकरच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. हा शो आजपासून सोनी टीव्हीवर रात्री 9.30 वाजता प्रसारित होईल. तिच्यासोबत नवजोत सिंग सिद्धू आणि गायक शानही परीक्षक म्हणून दिसतील. याशिवाय ती ‘पिच टू गेट रिच’ या मॉडेलिंग शोमध्ये करण जोहरसोबत जज म्हणून झळकणार आहे. हा शो 20 ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.