मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. दीपिका-रणवीर, प्रियंका-निक यासारख्या प्रसिद्ध जोडप्यांनंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मलायका-अर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे.
दोघांनीही आपल्या नातेसंबंधांबद्दल उघड वाच्यता केलेली नाही. मात्र अर्जुन आणि मलायका एप्रिल 2019 मध्ये विवाहगाठ बांधणार असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मलायका 45 वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या 33 वर्षांचा आहे.
साक्षात करण जोहरनेही 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये मलायकाच्या पुनर्विवाहाचे संकेत दिले आहेत. एन्ट्रीला करणने आमीर आणि मलायकाचा हात धरला होता. 'लवकरच हे तुझ्यासोबत घडणार आहे' असं करण म्हणताच मलायकाने त्याला गप्प केलं.
मलायकाने इटलीमध्ये अर्जुन कपूरसोबत बर्थडे सेलिब्रेशन केल्याचं म्हटलं जातं. दोघं अनेकदा एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. लॅक्मे फॅशन वीकमध्येही दोघं हातात हात घालून हजेरी लावताना दिसले होते.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजही गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं.