मुंबई : 'सीबीएफसी'चे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनाच आता सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात धाव घ्यायची वेळ आली आहे. आपला आगामी सिनेमा 'रंगीला राजा' साठी निहलानींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्यावर असलेली खुन्नस काढण्यासाठी काही जण आपल्याविरोधात कट कारस्थान रचत असल्याचा आरोप निहलानींनी केला आहे.
सेन्सॉर बोर्डाने 'रंगीला राजा'वर लावलेल्या 20 कट्सवर आक्षेप घेत निहलानींनी विरोध केला आहे. ही याचिका सोमवारी हायकोर्टापुढे सादर करण्यात आली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
इतकंच नाही तर सीबीएफसीच्या कामकाजात काही केंद्रीय मंत्री सतत ढवळाढवळ करत असतात. आपल्या कार्यकाळात आपण त्यांचे फोन घेतले नाहीत आणि आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपलं काम केलं. ही गोष्टी अनेकांना रुचलेली नाही. त्यामुळे निव्वळ सूड उगवण्यासाठी हे षडयंत्र आपल्याविरोधात सुरु असल्याचं निहलानी म्हणत आहेत.
भारतीय बँकांना शेकडो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. निहलानींच्या 'इल्जाम' आणि 'आँखे' या सुपहिट चित्रपटांत काम करणारा बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' गोविंदा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
खरंतर, आजवर काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी निहलानी यांच्या कामकाजावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हीच वेळ खुद्द पहलाज निहलानींवर आली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सीबीएफसी'चे माजी प्रमुख निहलानीच सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
05 Nov 2018 07:18 PM (IST)
सेन्सॉर बोर्डाने पहलाज निहलानींचा चित्रपट 'रंगीला राजा'ला 20 कट्स सुचवल्याने त्यांनी विरोध केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -