Merry Christmas Trailer: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विजय सेतूपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमस (Merry Christmas) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीनं लक्ष वेधले आहे.


ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष 


श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला कतरिना आणि विजय सेतुपती यांची भेट दाखवण्यात आली आहे. मग कतरिना आणि विजयचा एकमेकांसोबत फ्लर्ट करतात. पुढे ट्रेलरमधील कतरिना विजयला तिच्यासोबत ख्रिसमस साजरा करण्याची ऑफर देते आणि नंतर हळूहळू कथा थ्रिलर होताना दिसते. चित्रपटातील कतरिना कैफ आणि विजयच सेतुपती यांचा लिपलॉक किसिंग सीन देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. या सीननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा ट्रेलर:






कधी रिलीज होणार मेरी ख्रिसमस (Merry Christmas Release Date)


मेरी ख्रिसमस हा चित्रपट हिंदी आणि तमिळ व्हर्जनमध्ये रिलीज होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांच्याशिवाय या चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद हे कलाकार काम करणार आहेत. तसेच राधिका सरथकुमार, षणमुगराजा, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर या चित्रपटात कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 कतरिना आणि विजय पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन


कतरिना कैफचा 'टायगर 3' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात तिनं सलमान खानसोबत काम केलं होतं.  तसेच विजय हा शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता कतरिना आणि विजय हे दोघे  मेरी ख्रिसमस या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Merry Christmas : कतरिना कैफ अन् विकी कौशलच्या 'मेरी क्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित