Makar Sankranti 2023 : आज देशभरात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साजरा होत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. पण या सगळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) लेकीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


महेश बाबूच्या लेकीचा म्हणजे सिताराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सितारा चाहत्यांना मराठीतून शुभेच्छा देताना दिसत आहे. ती म्हणत आहे,"मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला". 


सिताराचा व्हिडीओ तिच्या आईने म्हणजेच नम्रता शिरोडकरणे (Namrata Shirodkar) तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा". सिताराच्या या व्हिडीओवर 'आपली माती, आपली संस्कृती', 'छान मराठी बोलतेस', 'महेश बाबू आणि नम्रताचा अभिमान वाटतो', 'लेकीवर चांगले संस्कार झाले आहेत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरचा चाहत्यांना अभिमान वाटत आहे. दाक्षिणात्य संस्कृतीसोबतच मराठी संस्कृतीदेखील ते जपत आहेत. दोन्ही संस्कृतीचा उत्तम मेळ त्यांनी साधला आहे. दाक्षिणात्य सणांसह मराठी सणदेखील त्याच उत्साहात साजरे करताना ते दिसतात. 


सितारा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. वडिलांप्रमाणेच तिचादेखील मोठा चाहतावर्ग आहे. एक सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून सिताराकडे पाहिले जाते. महेश बाबू आणि नम्रता सिताराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 


संबंधित बातम्या


Ketaki Chitale : "खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला"; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा