Ketaki Chitale Facebook Post On Makar Sankranti 2023 : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. आज मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने तिने तिच्या स्टाइलने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


मकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट (Ketaki Chitale Facebook Post On Makar Sankranti) केली आहे. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत आज देशभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. पण केतकीने मात्र तिच्या स्टाइलने चाहत्यांना गोड बोलण्याचा सल्ला दिला आहे. 


मकरसंक्रांतीनिमित्त केतकीची फेसबुक पोस्ट (Ketaki Chitale Facebook Post) 


केतकी चितळेने फेसबुकवर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत लिहिलं आहे,"जे वर्षानुवर्षे मी लिहित आले आहे तेच आज पुन्हा लिहित आहे. तिळगुळ खा आणि खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा". केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 



केतकीच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ही पोरगी बिनधास्त बोलते पण नेहमी सकारात्मक हसतमुख खरं बोलते पण काही लोकांना मात्र टोचते, पटलं हे आपल्याला, आजकाल लोक फक्त गरज असेल तरचं गोड बोलतात, जो खरं बोलतो तो जगाला वाईट दिसतो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


केतकी चितळे कोण आहे?


'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.


केतकी चितळे प्रकरण काय?


आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत 14 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात राज्यभरात विविध गुन्हे दाखल झाले होते. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केली होती. त्यामुळे केतकीवर सध्या 21 विविध गुन्हे दाखल आहेत. पण आता 11 जुलैपर्यंत केतकीला ताब्यात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. 


संबंधित बातम्या


Ketaki Chitale : केतकी चितळेचं फेसबुकवर कमबॅक; पोस्ट शेअर करत दिली माहिती