Mahira Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'रईस' (Raees) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) सध्या चर्चेत आहे. माहिराने बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत (Salim Karim) तिने दुसरं लग्न केलं आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


कोण आहे माहिराचा पती सलीम? (Who Is Salim Karim)


माहिराचा पती सलीम करीम हा उद्योगपती आहे. 'पब्लिशएक्स (सिमपैसा) या संस्थेचा तो सह-संस्थापक आहे. माहिरा आणि सलीम 2017 मध्ये 'टॅपमॅट' नामक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमादरम्यान पहिल्यांदा भेटले. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 






माहिरा खान 2007 मध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अली अक्सारीसोबत लग्नबंधनात अडकली होती. अजलाने हे त्यांच्या मुलाचं नाव आहे. पण 2015 मध्ये ते विभक्त झाले आणि आता माहिराने दुसरं लग्न केलं आहे.


माहिराने लग्नसोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये माहिरा आणि सलीमचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. माहिरा आणि सलीमचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 






लग्नसोहळ्यादरम्यान माहिरा भावूक झालेली दिसून आली. माहिराला अश्रू अनावर झालेलं पाहून सलीमदेखील भावूक झाला होता. माहिराने 2020 मध्ये एका मुलाखतीत सलीमबद्दल भाष्य केलं होतं. सलीमसोबत डेट करत असल्याची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली होती. 


माहिरा खानबद्दल जाणून घ्या... (Who is Mahira Khan)


माहिरा खान (Mahira Khan) एक लोकप्रिय पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. पाकिस्तानातील अनेक सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'रईस' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्रीच्या आगामी कलाकृतींची चाहते प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Yaar Julahe: 'यार जुलाहे' मध्ये पाकिस्तानी कलाकार करणार गुलजार, मंटो आणि चुगताई यांच्या कथांचे वाचन