Salman Khan love life : सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक असतात. अनेकवेळा सलमान त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असतो. सलमानबाबत अभिनेता महेश मांजरेकर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. महेश यांनी सलमानच्या एकटेपणाबद्दल सांगितले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी सांगितले, 'सलमान खूप एकटा आहे. त्याच्या आयुष्यात कोणी नाही. सलमानच्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी ज्याच्यासोबत तो त्याचे सुख किंवा दु: ख वाटू शकेल. मी अनेक वेळा सलमानला लग्नाबद्दल विचारले पण तो नेहमी विषय टाळतो.' सलमानबद्दल महेश यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून अनेक जण अश्चर्यचकित झाले.
Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?
'अंतिम : द फाइनल ट्रुथ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
सलमानचा 'अंतिम : द फाइनल ट्रुथ' हा आगामी सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 25 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला होता. सलमान खानने स्वत: ट्विट करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन महेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील सलमानच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. चित्रपटामध्ये अभिनेता आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील "भाई का बर्थडे" हे गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला होता. सलमान खानने चित्रपटाच्या रिलीज डेटसोबत चित्रपटाशी संबंधित एक छोटा व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'Antim: The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सलमानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहे.
Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra