Shahrukh Khan Birthday : बॉलिवू़डमधील किंग खान अर्थात शाहरूख खानचा आज 56 वा वाढदिवस. शाहरूखचे फॅन्स त्याला बादशाह म्हणतात. शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. रोमॅंन्सचा किंग, बादशाह आणि किंग खान असलेल्या शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले. तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
25 जून 1992 रोजी प्रदर्शित झलेल्या 'दीवाना' या चित्रपटामधून शाहरूखने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्या आधी त्याने 'दिल आसना है' हा चित्रपट 'दीवाना'आधी साइन केला होता. दीवाना चित्रपटासाठी शाहरूखला बेस्ट डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. डर, कुछ-कुछ होता है, यस बॉस, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, DDLJ, मोहब्बतें, बादशाह या शाहरूखच्या सुपर हिट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra
शाहरूखच्या 'मन्नत' ची खास गोष्ट
शाहरूखचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या बंगल्याची गोष्ट हटके आणि खास आहे. 1997 मध्ये यस बॉस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदाच शाहरूखने मन्नत बंगल्याला पाहिले. त्यावेळी शाहरूखने हा बंगला खरेदी करायचे ठरवले. त्यावेळी नरीमन दुबास यांचा हे बंगल्याचे मालक होते. त्याचे नाव व्हिला विएना असे होते. 2001 मध्ये शाहरूख व्हिला विएनाचे मालक नरीमन दुबास यांना भेटला. त्यानंतर तो बंगला त्याने खरेदी केला. शाहरूखने या बंगल्याचे नाव जन्नत ठेवण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसानंतर या बंगल्याचे नाव मन्नत असे ठेवण्यात आले. त्यावेळी 13.32 कोटी रूपयांना हा बंगला शाहरूखने खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत 200 कोटी झाली आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. मन्नत बंगल्याचे इंटेरिअर शाहरूखची पत्नी गौरी खानने केले आहे.