Mahesh Babu: सध्या अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu)  हा अत्यंत खडतर काळामधून जात आहे. 2022 च्या सुरुवातीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं निधन झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्याच्या आईचं निधन झालं. 15 नोव्हेंबरला महेश बाबूचे वडील दिग्गज अभिनेते कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे निधन झाले. आता महेश बाबूनं वडिलांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. 

महेश बाबूची पोस्टमहेश बाबूनं कृष्णा घट्टामनेनी यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. या फोटोला महेशनं कॅप्शन दिलं, 'तुम्ही निर्भयपणे आयुष्य जगला. धाडसी आणि डॅशिंग असा तुमचा स्वभाव होता. तुम्ही माझी प्रेरणा आहात. मी तुम्हाला अभिमान वाटेल, असच काम नेहमी करत राहणार आहे.  लव्ह यू नाना. माय सुपरस्टार. ' 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

महेश बाबूच्या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. महेश बाबूची पत्नी शिल्पा शिरोडककर, कौशल मंडा यांनी महेश बाबूच्या पोस्टला कमेंट केल्या आहेत. तर काही युझर्सनी महेश बाबूच्या पोस्टला कमेंट करुन कृष्णा घट्टामनेनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

कृष्णा घट्टामनेनी यांची मुलगी मंजुलानं देखील एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 'तुम्ही माझे हिरो आहात.' असं मंजुलानं पोस्टमध्ये लिहिलं.  कृष्णा घट्टामनेनी हे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असण्यासोबत ते राजकारणीदेखील होते. गेल्या पाच दशकांत त्यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Krishna Ghattamnaneni: कृष्णा घट्टामनेनी यांचे निधनानंतर मुलगी मंजुलाची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'नाना मी..'