Kedar Shinde On Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत. 


आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे,"संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण". 






केदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,"जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण...हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव चव्हाण यांचं नातं राजकारण्याच्याही पलिकडचं होतं...हेच नातं उलगडणार 28 एप्रिल 2023 रोजी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात...आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर...यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत अतुल काळे". 


अतुल काळे कोण आहेत?


अतुल काळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'वास्तव','जिस देश मै गंगा रहता है','दे धक्का' अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. तसेच अतुल काळे यांनी 'बाळकडू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 


'महाराष्ट्र शाहीर' हा बहुचर्चित सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; केदार शिंदेंनी केली खास पोस्ट शेअर