Indira Devi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची (Mahesh Babu) आई इंदिरा देवी (Indira Devi) यांचे  हैदराबाद येथे निधन झाले आहे. इंदिरा देवी यांनी बुधवारी (28 सप्टेंबर) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंदिरा देवी या सुपरस्टार कृष्णा (Superstar Krishna) यांच्या पत्नी होत्या. महेश बाबूच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन इंदिरा देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


महेश बाबू यांच्या आई इंदिरा देवी यांचे पार्थिव पद्मालय स्टुडिओमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महेश बाबूच्या काही चाहत्यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन इंदिरा देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 










महेश बाबू हा त्याच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी इंदिरा देवी यांचा खास फोटो शेअर केला होता. त्यांचा फोटो शेअर करुन महेश बाबूनं कॅप्शन दिलं होतं, 'हॅप्पी बर्थ-डे अम्मा' तसेच महेशनं मदर्स-डेला देखील इंदिरा देवी यांचा फोटो शेअर करुन मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 


सतीश रेडी यांनी इंदिरा देवींच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. महेश बाबूचे जवळचे नातेवाईक आणि इतर कुटुंबीय इंदिरा देवींचे अत्यंदर्शन घेण्यासाठी पद्मालय स्टुडिओमध्ये येतील.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Happy Birthday Mahesh Babu : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी करिअरची सुरुवात, वडिलांमुळे घेतला 9 वर्षाचा ब्रेक! वाचा अभिनेता महेश बाबूबद्दल..