Mahendra Singh Dhoni Unknown Facts : क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) आज वाढदिवस आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल म्हणून लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे. आयपीएलमध्ये (IPL) आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवणाऱ्या धोनीची गोष्ट रुपेरी पडद्यावर आली आहे. पण सिनेमात दाखवलेली धोनीची लव्हस्टोरीही रिअल लव्हस्टोरीपेक्षा थोडी वेगळी आहे. 


महेंद्र सिंह धोनीला क्रिकेटची आवड कशी लागली? 


7 जुलै 1981 रोजी झारखंडच्या रांची येथे महेंद्र सिंह धोनीचा जन्म झाला. मध्यवर्गीय घराण्यात धोनीचा जन्म झाला. लहानपणी धोनीने कधीही क्रिकेट खेळण्याचा विचार केला नव्हता. त्याचे वडील पान सिंह हे मूळचे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील असून नोकरीच्या निमित्ताने ते रांचीला गेले होते. धोनीला लहानपणी फुटबॉलपटू होण्याची इच्छा होती. पण शिक्षकांच्या सल्ल्याने त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्याला क्रिकेटची गोडी लागली. 
 
सिनेमापेक्षा वेगळी धोनीची लव्हस्टोरी...


धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni : The Untold Story) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण रिअल लव्हस्टोरीपेक्षी ही प्रेमकथा खूपच वेगळी आहे. खरं तर धोनी आणि साक्षी दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. साक्षीचे आजोबा वनविभागात अधिकारी होते तर धोनीचे वडील हे रांची येथील भारत सरकारच्या एका प्रकल्पात काम करत होते. नोकरीसाठी ते रांचीला स्थायिक झाले. साक्षीचे वडील याच कारखान्यात काम करत असल्याने ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. धोनी आणि राक्षी हे दोघेही रांची येथील डीएव्ही श्यामली या शाळेत शिकत होते. पण नंतर साक्षी आणि तिचे कुटुंबीय डेहराडूनला गेले. 


10 वर्षांनी झाली भेट, अन्...


साक्षी आणि तिचे कुटुंबीय डेहराडूनला गेल्यानंतर धोनी आणि तिची भेट 2007 साली कोलकात्यात झाली.  टीम इंडियाची टीम कोलकात्यातील हॉटेल ताज बंगालमध्ये थांबली होती आणि त्याच हॉटेलमध्ये साक्षी इंटर्नशिप करत होती. या भेटीनंतर साक्षी आणि धोनी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. धोनीचा पहिला मेसेज आल्यानंतर साक्षी त्यावेळी आश्चर्यचकित झाली होती. या भेटीनंतर त्यांच्यात छान मैत्री झाली आणि 2008 मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अखेर 2010 साली ते लग्नबंधनात अडकले.