Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर झाली आहे. 


'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. 


केदार शिंदे यांनी ओंकार मंगेशची एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा.. त्यांनी सिनेमात सुद्धा काम केलं होतं.. 1965 साली प्रदर्शित झालेल्या 'वावटळ' या सिनेमात त्यांनी 'दादला नको ग बाई' हे गाणं गावून त्यावर परफॉर्म सुद्धा केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांच्या ऑफर त्यांना आल्या होत्या पण त्यांनी पुन्हा कधीही सिनेमासाठी गाणं गायलं नाही आणि पडद्यावर काम सुद्धा केलं नाही.. असं का? या मागचं नेमकं काय कारण होतं? शाहीरांचा रोचक जीवन प्रवास उलगडणार 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाद्वारे... 28 एप्रिल 2023 रोजी तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात..."






'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमितेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी केदार शिंदेंनी अंकुश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. 


संबंधित बातम्या


Ankush Choudhary : केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ


Kedar Shinde : शाहीर साबळेंनी सिनेमातील गाणी का गायली नाहीत? केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट