Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आलं आहे. 


नेहा आणि अविनाशच्या नात्याचं सत्य सिम्मीनं आणलं आजोबांसमोर


अविनाश हा नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य आता सर्वांसमोर आलं आहे. यश आणि परीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत सिम्मीनं एक खास प्लॅन बनवला होता. त्यानुसार नेहा आणि अविनाशच्या नात्याचं सत्य सिम्मीनं आजोबांसमोर आणलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिम्मीने अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशला सांगितलं होतं. 


अविनाशचं सत्य यशसमोर आल्यानंतर यशला मोठा धक्का बसला होता. नेहा त्याला स्वत:हून अविनाश बद्दल सांगेल असं त्याला वाटत होतं. नेहानेदेखील यशला सांगण्याचे अनेक प्रयत्न केले. पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. याचाच फायदा सिम्मीनं घेतला. नेहा आणि अविनाशच्या नात्याचं सत्य सिम्मीने सर्वांसमोर आणलं. 






श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं सत्य नेहा सांगणार यशला


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका उत्कंठावर्धक वळणावर; अविनाशचं सत्य अखेर सिम्मीसमोर