मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह चक्रवर्ती अखेर विवाहबंधनात अडकला. उटीमध्ये मॉडेल मदालसा शर्मासोबत एका छोटेखानी सोहळ्यात त्याने लगीनगाठ बांधली.

मिमोह आणि त्याची आई-अभिनेत्री योगिता बाली यांच्याविरोधात एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्याची सक्ती केल्याचा आरोप केला आहे.

मदालसा ही बॉलिवूड अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या आहे. उटीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये सात तारखेला दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र विवाहस्थळी पोलिसांचं पथक दाखल झाल्यानंतर वधूपक्ष तिथून निघून गेला.

बलात्काराच्या आरोपांनंतर महाअक्षय चक्रवर्तीचा लग्नसोहळा रद्द

दिल्लीतील कोर्टाने योगिता आणि महाअक्षय यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याआधी, दोघांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज बॉम्बे हायकोर्टानं फेटाळून लावला होता. दिल्लीतील कोर्टाचे आदेश असल्यानं ही याचिका इथं उभी रहात नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं होतं.



योगिता आणि महाअक्षयविरोधात हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्रीने तक्रार केल्याची माहिती आहे. लग्नाच्या आमिषाने महाअक्षयने शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा तिने केला आहे. गर्भधारणा झाल्यानंतर महाअक्षयने आपल्याला दिलेल्या औषधामुळे आपला गर्भपात झाल्याचं तिने सांगितलं.

मिथुन चक्रवर्तींच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामिन अर्ज हायकोर्टानं फेटाळला

योगिता बाली यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. परिणामांना घाबरुन आपण मुंबई सोडून दिल्लीला पळाल्याचंही तिने सांगितलं.

महाअक्षयने 2008 साली 'जिमी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हाँटेड, लूट यासारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला होता.