मुंबई : तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मुल्क’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात तापसी पन्नू एका वकिलाची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

रजत कपूर, आशुतोष राणा, नीना गुप्ता यांचीदेखील या सिनेमात महत्वाची भूमिका आहे.‘मुल्क’चे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं असून 3 ऑगस्टला हा सिनेमा देशभरात रिलीज होत आहे.

'मुल्क' सिनेमातून धार्मिक कट्टरता आणि दहशतवादासारख्या गंभीर विषयांवर भाष्य केलं गेलं आहे. तसंच काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजालाच बदनाम करण्याच्या मानसिकतेलाही फटकारण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.



‘माझा मॅनेजर हा धर्माने मुस्लीम आहे. तसंच माझा ड्रायव्हर आणि घरात काम करणारा व्यक्तीही मुस्लीम धर्मीय आहे. या लोकांकडून मला जर त्रास झाला असता तर मी नेहमीच डिस्टर्ब राहिली असते. ही लोकं माझ्या आयुष्याचा अतूट भाग आहेत आणि माझं जीवन यांच्यामुळेच व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका धर्माला टार्गेट केलं जाणं वेदनादायी आहे. मी हा सिनेमा स्वीकारण्यामागेही हेच कारण आहे,’ असं म्हणत तापसी पन्नूने सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.