माधुरीसाठी तिच्या आईने एका खास स्कार्फ बनवला असून हाच स्कार्फ परिधान करुन तिने त्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘माझ्या 85 वर्षाच्या आईने हा सुंदर स्कार्फ खास माझ्यासाठी तयार केला आहे. आयुष्यातील तिचा हा उत्साह खरंच प्रेरणादायी आहे.’ असं तिने या फोटोसोबत म्हटलं आहे.
माधुरीच्या या फोटोला सध्या सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. दरम्यान, माधुरी सध्या तिच्या मराठी ‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं पोस्टर तिने मकरसंक्रातीच्या दिवशी ट्विटरवरुन शेअर केलं होतं.
विशेष म्हणजे, एका मुलाखतीतही बोलताना तिने या सिनेमात नेहमीपेक्षा प्रेक्षकांना वेगळं पाहायला मिळेल असं सांगितलं होतं. तसेच, या सिनेमातून प्रेक्षकांना जगण्याची एक नवी दिशा मिळेल, असंही ती म्हणाली होती.
संबंधित बातम्या :