Madhuri Dixit : सुधीर फडके (Sudhir Phadke) म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे. परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक चढउतार यादरम्यान आले. त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.


परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे. 






चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) म्हणतात,"मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे, कलाकारांचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार".


तगडी स्टारकास्ट असलेला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'  


'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


अमेरिकेत  'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे शंभर शोज 'हाऊसफुल्ल' 


'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला आपली पसंती दर्शवली. चोहोबाजुंनी असा कौतुकाचा वर्षाव होत असतानाच परदेशातही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे 100 शोज 'हाऊसफुल'च्या दिशेने वाटचाल करत आहेत तर चित्रपटाला अनेकांनी 5 स्टार्स दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ग्लोबलीही 'सुपरहिट'चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Marathi Movie : अमेरिकेत मराठी चित्रपटाचे शंभर शोज 'हाऊसफुल्ल'; तुम्ही पाहिलाय का 'हा' चित्रपट?