तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं नवीन पोस्टर आणि रीलिजिंग डेट प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे करण जोहरनेही मराठीमध्ये ट्वीट केलं आहे. 'चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली' असं करणने म्हटलं आहे.
'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज येतो. 'माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.