मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा सिनेमा ‘बागी 2’ ने वीकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तीन दिवसांमध्ये एकूण 73.10 कोटी रुपयांची कमाई करत या सिनेमाने अनेक विक्रम मोडले. ‘बागी 2’ ने रविवारी 27.60 कोटींचा गल्ला जमवला.


'बागी 2' ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा ठरला. तर दुसऱ्या दिवशी 20.40 कोटी आणि रविवारी 27.60 कोटींचा गल्ला जमवला.

भारतात 3500, तर परदेशात 625 अशा एकूण 4125 स्क्रीनवर हा सिनेमा वर्ल्डवाईड रिलीज झाला आहे.

'बागी 2' हा 2016 साली रिलीज झालेल्या 'बागी' सिनेमाचा सिक्वल आहे. 'बागी'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'बागी'मध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते, तर 'बागी 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिशा पटाणी मुख्य भूमिकेत आहे.

सिनेमाची आतापर्यंतची कमाई

पहिला दिवस – 25.10 कोटी

दुसरा दिवस – 20.40 कोटी

तिसरा दिवस – 27.60 कोटी

एकूण – 73.10 कोटी