मुंबई: तामीळ चित्रपटातील जीएसटीबाबतच्या संवादावर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला. मात्र त्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी राहुल गांधींना जुनी आठवण करुन देत कोंडी करण्याच प्रयत्न केला.


काय आहे प्रकरण?

दाक्षिणात्य अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर्सल’ या तामिळ चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटात जीएसटीबाबत केलेला उल्लेख चुकीचा असून संबंधित संवाद चित्रपटातून हटवण्याची मागणी भाजपने केली आहे.

चित्रपटात जीएसटीवर भाष्य, भाजपची संवाद हटवण्याची मागणी

चित्रपटातून अभिनेता विजयचा मोदींवरील द्वेष दिसत आहे. विजयला अर्थशास्त्राची जाण नसल्याचं यातून दिसत असल्याचं वक्तव्य भाजप नेते एच राजा यांनी केलं आहे.

राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

याप्रकारानंतर राहुल गांधींनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, “सिनेमा हे तामीळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तामिळी सन्मान दुखावू नका”

https://twitter.com/OfficeOfRG/status/921641445148131329

राहुल गांधींच्या या ट्विटनंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही तातडीने ट्विट करुन राहुल गांधींना रिप्लाय दिला.

मधुर भांडारकर यांचं ट्विट

मधुर भांडारकर म्हणाले, “सर, कोणत्याही सिनेमावर बंदी घालणं याला माझा विरोध आहे. मला त्यावेळी तुमच्या पाठिंब्याची गरज होती, ज्यावेळी तुमचे (काँग्रेसचे) कार्यकर्ते इंदू सरकारला विरोध करत होते. मात्र त्यावेळी तुम्ही शांत राहिलात”.

https://twitter.com/imbhandarkar/status/921654574385115136

जेव्हा इंदू सरकारला काँग्रेसने विरोध केला होता

‘इंदू सरकार’ चित्रपटात इंदिरा आणि संजय गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला तर तीव्र पडसाद उमटू शकतात, असा इशारा काँग्रेसने दिला होता.

संबंधित बातम्या

‘इंदू सरकार’ न दाखवता रिलीज केल्यास कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील: विखे 


इंदू सरकार, संजय गांधी आणि ‘ती’!