गेल्या दोन दिवसांपासून करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन्स आणि मधुर भंडारकर यांच्या नवा वाद उफाळून आला आहे. करण जोहर बनवत असलेल्या नव्या वेबसीरीजच्या नावात बॉलिवूड वाईव्ज असं आहे. यावरून हे नाव आपण रजिस्टर केल्याचा दावा मधुर भंडारकर यांनी केला आहे. भंडाकर यांच्या नव्या सिनेमाचं नाव बॉलिवूड वाईव्ज असल्यानं भंडारकर यांनी धर्माने घेतलेल्या नावावर आक्षेप घेतला होता. पण आता मधुर यांनीच ट्विट करून करण जोहरला उघडं पाडलं आहे.


मधुर भंडारकर यांनी ट्विट करून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कसं हे टायटल रजिस्टर केलेलं नाही ते सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी इम्पा आणि फिल्म-टीव्ही प्रोड्युसर्स गिल्ड यांनी धर्मा प्रॉडक्शन्सना पाठवलेल्या मेलचा संदर्भ दिला आहे. या ईमेलमध्ये या संस्थांनी असं कोणतंही टायटल धर्माने रजिस्टर केलेलं नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. हा स्क्रीन शॉट मधुर यांनी शेअर करत करण जोहरने हे नाव वापरणं कसं चूक आहे हेच दाखवून दिलं आहे.


काही दिवसांपूर्वी आपलं टायटल धर्मा प्रॉडक्शन्सने वापरून नैतिकदृष्ट्या चूक केल्याचं म्हटलं होतं. त्यावरून धर्मा आणि मधुर यांच्यात वाद पेटला होता. करण जोहर बनवत असलेल्या वेबसीरीजचं हे टायटल तातडीने बदललं जावं अशी मागणी मधुरने केली होती. पण त्यावर धर्माने काहीच उत्तर न दिल्याने मधुरने नाईलाजाने ही बाब सोशल मीडियाावर टाकली होती. त्याचाच फॉलोअप घेताना बॉलिवूड वाईव्ज हे टायटल मधुर यांच्याच मालकीचं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यावर अद्याप करण जोहरच्या धर्माकडून कोणतीही टिप्पणी आलेली नाही.


संबंधित बातम्या :


Drug Case | भारती-हर्षला जॉनी लिव्हर यांचा मोलाचा सल्ला


महाराष्ट्र सरकार अन् मुंबई पोलिसांना खुल्लं आव्हान देणारी कंगना आता का पळतेय?