OTT Release This Week : ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहेत. विनोद, अॅक्शन, थरार नाट्य अशा सर्व प्रकारच्या कलाकृतींचा यात समावेश आहे. त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.


दुरंगा 2 (Durangga 2)
कधी रिलीज होणार? 24 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? झी5


'दुरंगा 2' ही सायकोलॉजिकल ड्रामा असणारी सीरिज आहे. रोहित सिप्पीने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. झी 5 वर 24 ऑक्टोबर 2023 रोजी ही सीरिज रिलीज झाली आहे. 'दुरंगा 2' या सीरिजमध्ये अमित गाध, गुलशन देवैया आणि दृष्टी धामी मुख्य भूमिकेत आहेत. 'दुरंगा 2'च्या कथानकापासून ते स्टारकास्टपर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त आहेत. थरार-नाट्य पाहण्याची आवड असेल तर ही सीरिज नक्की पाहा.


परमपोरुल (Paramporul)
कधी रिलीज होणार? 24 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'परमपोरुल' हा तामिळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा तामिळ क्राइम सिनेमा आहे. या सिनेमात आर सरतकुमार, अमिताभ प्रधान, करिश्मा परदेशी आणि बालाजी शक्तिवेल मुख्य भूमिकेत आहेत. 


एस्पिरेंट्स (Aspirants 2)
कधी रिलीज होणार? 25 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'एस्पिरेंट्स' या बहुचर्चित सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'एस्पिरेंट्स 2' ही सीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज झाली आहे. नव्या सीझनमध्ये अभिलाष, गुरी आणि एसकेची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संदीप भैयादेखील या सीरिजमध्ये दिसणार आहे.


कॉफी विथ करण 8 (Koffee With Karan 8)
कधी रिलीज होणार? 26 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' हा वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अर्थात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हजेरी लावणार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 26 ऑक्टोबरला हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.


चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2)
कधी रिलीज होणार? 26 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


बॉलिवूडची 'पंगाक्वीन' पुन्हा एकदा ओटीटीवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पी. वासू यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात कंगनासह राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत आहे. 2005 मध्ये आलेल्या 'चंद्रमुखी' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 


कॉबवेब (Cobweb)
कधी रिलीज होणार? 27 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? लायंसगेट प्ले


'कॉबवेब' हा भयपट प्रेक्षकांना 27 ऑक्टोबर 2023 रोजी लायंसगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. आठ वर्षीय पीटरच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.


पेन हसलर्स (Pain Hustlers)
कधी रिलीज होणार? 27 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'पेन हसलर्स' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. डेविड येट्स यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ह्यूजेस नामक पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. 27 ऑक्टोबरला नेटफ्सिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


लाईफ ऑन आवर प्लॅनेट (Life Of Our Planet)
कधी रिलीज होणार? 25 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'लाईफ ऑन आवर प्लॅनेट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना जगण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज झाली आहे.


सिस्टर डेथ (Sister Death)
कधी रिलीज होणार? 27 ऑक्टोबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'सिस्टर डेथ' हा भयपट असून येत्या 27 ऑक्टोबरपासून प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Ott Release This Week: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; या आठवड्यात रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरिज