Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.  नुकताच एका  पुरस्कार सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला आहे.   या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओमध्ये  मलायका ही स्टेजवर लाडू वळताना दिसत आहे. तसेच ती "ऐका दाजीबा!" या गाण्यावर डान्स देखील करताना दिसत आहे.

Continues below advertisement


‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ या पुरस्कार सोहळ्यात मलायकानं "ऐका दाजीबा!"  या गाण्यावर परफॉर्म केलं आहे. तसेच तिनं या पुरस्कार सोहळ्यामध्ये लाडू देखील वळले. हा लाडू ती गायक सलील कुलकर्णीला देताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका ही सलीलला लाडू देताना मराठी भाषेत बोलत आहे. ती म्हणते, "फक्त लाडू देणार, मी नाही येणारे" 


मलायकाचा "ऐका दाजीबा!"  या गाण्यावर  परफॉर्मन्स पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. हा संपूर्ण पुरस्कार सोहळा प्रेक्षक 4 नोव्हेंबर पाहू शकणार आहेत.


पाहा व्हिडीओ:






'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.  अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.   मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही  सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला  18.6 मिलियन फॉलोवर्स आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या:


Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...