कॅलिफोर्निया : 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू…' असं म्हणत पुरस्कार देणाऱ्यांनी पॉझ घेतला, उपस्थितांच्या काळजाच्या ठोक्यांचा वेग वाढला, त्यानंतर 'ला ला लॅण्ड'ची 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा झाली आणि कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.


चित्रपटातील कलाकारांनी मंचावर येऊन पुरस्कारही स्वीकारला. ते भाषणाच्या तयारीतही होते. पण तेवढ्यात आणखी एक घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट चित्रपट 'ला ला लॅण्ड' नसून 'मूनलाईट' असल्याचं जाहीर झालं आणि थिएटमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आयोजकांच्या चुकीमुळे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मूनलाईट'ऐवजी 'ला ला लॅण्ड'ची घोषणा झाली होती.

पुरस्कार देणाऱ्यांनी वेळीच ही चूक दुरुस्त केली आणि 'मूनलाईट'ला 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. घडलेल्या प्रकाराने कॅलिफोर्नियाचं डॉल्बी थिएटरच नव्हे तर जगभरातील सिनेरसिक क्षणभर स्तब्ध झाले होते.

'मूनलाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन विभागांमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. दरम्यान, सर्वोत्कृष्ट चित्रपटाने 'ला ला लॅण्ड'ला हुलकावणी दिली असली तरी ऑस्कर सोहळ्यात याच चित्रपटचा बोलबाला पाहायला मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यंदाचा ऑस्कर  केसी अॅफ्लेक तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर एमा स्टोनला मिळाला.

ऑस्कर पुरस्कारांचं यंदाचं हे 89वं वर्ष आहे.

पुरस्कारांची यादी



  • #Oscars: 'ला ला लॅण्ड'ला चुकून ऑस्कर, खरा विजेता 'मूनलाईट'

  • #Oscars: 'ला ला लॅण्ड' सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • #Oscars: एमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 'ला ला लॅण्ड'साठी पुरस्कार

  • #Oscars: केसी अॅफ्लेक सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'मँचेस्टर बाय द सी'साठी पुरस्कार

  • #Oscars: डॅमियन शेझल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ला ला लॅण्ड

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर - ला ला लॅण्ड

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - ला ला लॅण्ड

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा - मँचेस्टर बाय द सी

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले - मूनलाईट

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - ला ला लॅण्ड

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - सिंग

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट - द व्हाईट हेल्मेट

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार 'द जंगल बुक' सिनेमाला

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी 'ला ला लॅण्ड'ला पुरस्कार

  • #Oscars: सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म 'पायपर', तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म 'झुटोपिया'

  • #Oscars: 'द सेल्समन'ला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार

  • #Oscars: वायोला डेव्हिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, 'फेन्सेस चित्रपटासाठी पुरस्कार

  • #Oscars: 'हॅक्सॉ रिज'ला सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर

  • #Oscars: 'अरायव्हल'साठी सलवेन बेलमेरला सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंगचा ऑस्कर

  • Oscars: मेकअप आणि केशरचनेसाठी 'सुसाईड स्क्वॉड'च्या टीमला ऑस्कर

  • Oscars: 'फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम'साठी कॉलिन एटवूडला वेशभूषेचा ऑस्कर

  • Oscars: 'ओ.जे.: मेड इन अमेरिका' सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर

  • Oscars: पहिला पुरस्कार जाहीर, मेहर्शाला अली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मूनलाईट सिनेमासाठी पुरस्कार


पाहा व्हिडीओ