मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 'ऐ दिल है मुश्किल', 'क्वीन', 'हाऊसफुल 3' सारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री लिजा हेडन बॉयफ्रेण्ड दिनो लालवानीसोबत विवाहबद्ध झाली.
लिजाने इन्स्टाग्रामवरुन लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी सांगितली आहे. पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक गुल्लू लालवानी यांचा मुलगा दिनो आणि लिजा यांचं रविवारी लग्न झालं. लग्नात लिजाने शुभ्र रंगाचा गाऊन परिधान केला होता.
चेन्नईत जन्मलेल्या 30 वर्षीय लिजाचं बरंचसं आयुष्य परदेशात गेलं. मुंबईत येण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तिचं वास्तव्य होतं. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केलं आणि 2010 मध्ये आयेशा चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. क्वीन चित्रपटात तिने साकारलेल्या विजयालक्ष्मीच्या व्यक्तिरेखेचं चांगलंच कौतुक झालं.