सिनेमात महिलांचं चित्रण आक्षेपार्ह पद्धतीने केल्याचं आढळल्यास त्या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याचे अधिकार सेन्सॉर बोर्डाकडे असल्याचं सांगत निहलानी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 26 ऑक्टोबरला रिलीज होणारा हा सिनेमा खोळंबला होता. मात्र त्याविरोधात सिनेमाच्या टीमने जोरदार आवाज उठवला आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक चित्रपट महोत्सवात सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर तिथे या सिनेमाने अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केलेत. कोंकणा सेन-शर्मा आणि रत्ना पाठक-शाह या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अलंकृता श्रीवास्तव हिने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.