Lew Palter Passed Away : जेम्स कॅमरुनच्या (James Cameron) 'टायटॅनिक' (Titanic) या बहुचर्चित सिनेमातील अभिनेते ल्यू पाल्टर (Lew Palter) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. द हॉलिवूड रिपोर्टनुसार, पाल्टर यांचे 21 मे रोजी कर्करोगामुळे (Lew Palter Dies) निधन झाले आहे. 


ल्यू पाल्टर यांच्या भूमिकांबद्दल जाणून घ्या...


अभिनेते ल्यू पाल्टर हे 'फर्स्ट मंडे इन अक्टूबर' (First Monday in October) या सिनेमात वकिलाच्या भूमिकेत होते. 1981 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ते वाल्टर मथाऊ, जिल क्लेबर्ग आणि बरनार्ड ह्यूजेससोबत झळकले होते. तसेच 'द फ्लाइंग नन', 'हिल स्ट्रीट ब्लूज' आणि 'एलए लॉ' या सिनेमातदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. '1976-77 सीबीएस सीरिज डेल्वेचियो'मध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. यात जुड हिर्श मुख्य भूमिकेत होते. 


शिक्षक ते अभिनेते.. ल्यू पाल्टर


ल्यू पाल्टर 1971 साली कार्ल आर्ट्समध्ये सहभागी झाले होते. 2013 पर्यंत त्यांनी सांता क्लैरिटा या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले आहेत. ल्यू पाल्टर यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थांमध्येही अभिनयाची गोडी निर्माण झाली. 






ल्यू पाल्टर यांचा सिनेप्रवास... 


ल्यू पाल्टर यांनी हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 'टायटॅनिक' या सिनेमात त्यांनी इसिडोर स्ट्रॉस हे पात्र साकारलं होतं. तर 'फर्स्ट मंडे इन अक्टूबर' या सिनेमात ते जस्टिस बेंजामिन हेल्परिनच्या भूमिकेत झळकले होते. त्यांच्या या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'लेट मॅन लिव', 'ओवररुल्ड आणि द ट्रायल ऑफ ल्यूकुलस' सारख्या अनेक नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. 


ल्यू पाल्टर यांनी रुपेरी पडद्यासह छोटा पडदाही गाजवला आहे. पाल्टरने डे बाय डे , चार्लीज एंजल्स , बरेटा , द वर्जिनियन , कोलंबो , द हाई चैपरल , गनस्मोक , मिशन: इम्पॉसिबल , द सिक्स मिलियन डॉलर मैन , कोजक , द ब्रैडी बंच आणि द सहित सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ल्यू पाल्टर यांच्या पश्चात मुलगी आणि सैम, टेसा, मिरांडा ही नातवंडे असा परिवार आहे. 


संबंधित बातम्या


केट विन्सलेटचा मोठा खुलासा; 'टायटॅनिक'च्या यशानंतर ब्रिटीश प्रेसने माझी वाईट हालत केली..