Thalapathy Vijay Leo OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' (Leo) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाळूळ घालत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे आता हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.


'लियो' या सिनेमात संजय दत्त, अनुराग कश्यप, प्रिया आनंद, तृषा कृष्णन, मैस्किन आणि बेबी एंटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगभरात हा सिनेमा लवकरच 600 कोटींचा टप्पा पार करणार आहे. सेवन स्क्रीन स्टुडिओ आणि द रूट बॅनर आणि एस.एस. ललित कुमार आणि जगदीश पलानीसामी यांच्या बॅनरअंतर्गत 'लियो' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


बॉक्स ऑफिसवर 'लियो'चा बोलबाला (Leo Box Office Collection)


'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर लियोने दणदणीत कमाई केली आहे. 'लियो' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 264 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात 53.35 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या वीस दिवसांनंतरही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. जगभरात आतापर्यंत 'लियो' या सिनेमाने 584 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 600 कोटींचा टप्पा पार करेल. 






'लियो' कधी अन् कुठे पाहता येणार?


'लियो' हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे लियो हा सिनेमा 16 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप नेटफ्लिक्सने ओटीटी रिलीज जाहीर केलेली नाही. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'लियो' 


लियो या सिनेमात थलापती विजय मुख्य भूमिकेत आहेत. थलापती विजयसह या सिनेमात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तदेखील (Sanjay Dutt) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तृषा, मैडोना सेबेस्टियन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैथ्यू थॉमस, मैसस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार या सिनेमाचा भाग आहेत. 'लियो' हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे.


'लियो' स्टार थलापती विजयने बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 1984-1998 या काळात त्याने पाच सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या सिनेमांचं दिग्दर्शन एसए चंद्रशेखर यांनी केलं आहे. विजयचा फक्त तामिळनाडू नव्हे तर केरळमध्येही मोठा चाहतावर्ग आहे.


संबंधित बातम्या


Leo Review : प्रभाव न पाडणारा विजयचा लियो