प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडालींचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2018 12:57 PM (IST)
प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं.
अमृतसर : प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं. अमृतसरमध्ये हृदयविकारच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. काल त्यांना अमृतसरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली. वडाली ब्रदर्सच्या अनेक मैफली गाजल्या आहेत. सुफी संगीत जनमानसात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वडाली ब्रदर्सचं 'तू माने या ना माने' ही गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच तनु वेड्स मनुमधील वडाली ब्रदर्सचं 'ए रंग रेज मेरे' हे गाणं हिट झालं होतं. दरम्यान, शिरोमणी अकाली दलचे सुखबीर सिंह बादल यांनी प्यारेलाल वडाली यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.