मुंबई : अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. भारताची गानसम्राज्ञी आज 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जगभरातील चाहत्यांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


सम्राज्ञीने गायलेली गाणी आजही चिरतरुण आहेत. लता दीदींनी आजवर 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. लता दीदींच्या आजवरच्या कारगिरीला सलाम म्हणून सरकारनेही 2001मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

VIDEO | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ज्य़ेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या 'हस्ते बेस्ट ऑफ लता' पुस्तकाचं प्रकाशन | ABP Majha



गेल्या अनेक वर्षांपासून लतादीदी आपला वाढदिवस कुटुंबियासोबत अत्यंत साधेपणाने साजरा करत आहेत. कालच गालता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित ‘बेस्ट ऑफ लता’ या पुस्तकाचं प्रकाशन  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ज्य़ेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलारही उपस्थित होते. लता मंगशेकर यांच्या 90वा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट ऑफ लता या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. घरातील सर्व भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव ‘हेमा’ असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी ‘लता’ असे नाव ठेवले.