Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. जगभरातील चाहते आज लता दीदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. तर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत, प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी आवडीनं ऐकतात. आज दीदींच्या पुण्यतिथीला पाहूयात त्यांची प्रसिद्ध गाणी... 


अजीब दास्तां है ये
दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील अजीब दास्तां है ये हे लता मंगेशकर यांचे गाणं हे गाणं प्रेक्षक आजही आवडीनं ऐकतात. या गाण्याचे गीतकार शैलेंद्र हे आहेत. तर गाण्याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिली आहे. 



पिया तोसे नैना लागे रे


1965 मध्ये रिलीज झालेल्या गाइड या चित्रपटातील पिया तोसे नैना लागे रे या गाण्याला अभिनेत्री वहिदा रेहमान यांचे नृत्य आणि लता मंगेशकर यांचा सुमधूर आवाज  लाभला आहे, त्यामुळे हे आजही प्रेक्षकांच्या आवडीचे गाणे आहे.



मेरा दिल ये पुकारे आ जा
नागिन या 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मेरा दिल ये पुकारे आ जा हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले. या गाण्यावरील रिल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गाण्याचे गीतकार राजिन्दर कृष्ण हे आहेत. 


लो चली मैं अपनी देवर की बारात ले के  


1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम आपके है कौन या चित्रपटामधील लो चली मैं अपनी देवर की बारात ले के हे गाणे देखील लता मंगेशकर यांनी गायले आहे.  सलमान खान, माधुरी दीक्षित  यांनी हम आपके है कौन या चित्रपटात काम केलं आहे.


जिया जले जाँ जले (Jiya Jale)


जिया जले जाँ जले या लता मंगेशकर यांच्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिलाली. हे गाणे दिसले या चित्रपटातील आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटानं काम केलं आहे.


मेरी आवाज ही पहचान है ( Meri Awaaz Hi Pehchaan Hai)


किनारा या चित्रपटातील मेरी आवाज ही पहचान है या लता मंगेशकर यांच्या गाण्यानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. या गाण्याचे गीतकार गुलजार हे आहेत. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Biography : लता मंगेशकरांनी पाच हजाराहून अधिक गाणी गायली, पण त्यांचं पहिलंच गाणं रिलीज झालं नाही, वाचा काय आहे हा किस्सा