Lara Dutta Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताचा (Lara Dutta) 45 वा वाढदिवस आहे. लारानं अनेक हिट  चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला आणि ग्लॅमरस स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लारा दत्तानं  2000 मध्ये मिस युनिवर्स  ही स्पर्धा जिंकली. जाणून घेऊयात लाराबद्दल...


लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाझियाबादमध्ये झाला.  लाराचे वडील एलके दत्ता पंजाबी आहेत. तर तिची आई अँग्लो इंडियन आहे.  लाराने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. 2000 मध्ये तिनं मिस युनिवर्स ही स्पर्धा जिंकली.  ही स्पर्धा जिंकण्यासाठी  अंतिम फेरीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात आला होता. स्पर्धकांच्या उत्तरांच्या आधारे परीक्षकांना विजेत्याचा निर्णय घ्यायचा होता. असाच एक अवघड प्रश्न लारा दत्ताला विचारण्यात आला,  या प्रश्नाचं उत्तर तिनं दिले की, त्यानंतर  तिला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आली.


मिस युनिवर्स स्पर्धेत लारानं दिलेल्या उत्तरानं वेधलं होतं अनेकांचे लक्ष 


 मिस युनिवर्स या स्पर्धेत लाराला प्रश्न विचारण्यात आला, 'मिस युनिवर्स स्पर्धेत  महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप करत काही लोक निषेध व्यक्त करत आहे. ते चुकीचे आहेत,  हे तुम्ही त्यांना कसे पटवून द्याल." यावर उत्तर देताना लारा म्हणाली की, 'मला वाटते की अशा स्पर्धांमुळे आमच्यासारख्या तरुण महिलांना आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत होते.' लाराचे हे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या परीक्षकांना खूप आवडले.






शूटिंगदरम्यान घडली होती दुर्घटना


लाराने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.  'नो एंट्री', पार्टनर', 'मस्ती', 'भागम भाग', 'हाऊसफुल', 'चलो दिल्ली' या चित्रपटांमुळे तिला लोकप्रि. तिने 2003 मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.अंदाज या चित्रपटामधील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान समुद्राच्या जोरदार लाटांमुळे लाराचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. यावेळी अक्षय कुमारने तात्काळ पाण्यात उडी मारून तिचा जीव वाचवला.  दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला होता.


 इतर महत्वाच्या बातम्या:


Happy Birthday Lara Dutta : टेनिसपटू अन् अभिनेत्रीची जोडी, बिझनेस मिटिंगमधून सुरु झाली लारा-महेशची लव्हस्टोरी!