Lalit Modi Biopic : आयपीएलचे (IPL) पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे ललित मोदी आणि त्यांच्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. 


ललित मोदींनी केलं होतं आईच्या मैत्रिणीसोबत लग्न


ललित मोदींवर बायोपिक येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांसमोर येत आहेत. सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी ललित मोदी यांनी त्यांच्या आईच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं होतं. ललित मोदी यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. परदेशात असतानाच त्यांनी त्यांच्या आईच्या मैत्रीणीला म्हणजेच मीनल यांना प्रपोज केलं होतं. त्या ललित मोदींपेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या होत्या. 


कुटुंबाच्या विरोधात जाऊन अडकले लग्नबंधनात


ललित मोदी आणि मीनल यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्यात निर्णय घेतला. 17 ऑक्टोबर 1991 रोजी ते लग्नबंधनात अडकले. ललित मोदी आणि मीनल यांनी रुचिर नावाचा मुलगा आहे. तर रुचिर यांना आलिया नावाची एक मुलगी आहे. मीनल यांचे 2018 मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे आता ललित मोदी सुष्मितासोबत लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात. 


ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा क्रिडा पत्रकार बोरिया मजूनदार यांच्या 'मॅवरिक कमिश्नर: द आयपीएल-ललित मोदी सागा' या पुस्तकावर आधारित आहे. ललित मोदी यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो


Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार