Lalit Modi Dating Ujjwala Raut India Supermodel : आयपीएलचे (IPL) पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत (Sushmita Sen) ब्रेकअप केल्यानंतर ललित मोदी आता सुपरमॉडल उज्जवला राऊतला (Ujjwala Raut) डेट करत आहेत. ललित मोदी आणि उज्जवला यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  


आंतरराष्ट्रीय खटले गाजवणारे वकील हरीश साळवे (Harish Salve) तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. लग्नसोहळ्यानंतर त्यांनी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला भारतातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. ललित मोदी यांनीदेखील या रिसेप्शनला हजेरी लावली. पण या रिसेप्शनला ते एकटेच आलेले नसून त्यांच्यासोबत 90 च्या दशकातील सुपरमॉडल उज्जवला राऊतदेखील (Ujjwala Raut) दिसून आली.



ललित मोदी आणि उज्जवला राऊत यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ललित मोदी यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला असून उज्जवलाने छान गाऊन परिधान केला आहे. फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. अद्याप दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. 


उज्जवला राऊत कोण आहे? (Who Is Ujjwala Raut)


45 वर्षीय उज्जवला राऊतचा जन्म 1978 मध्ये झाला आहे. 90 च्या दशकातील सुपरमॉडल म्हणून उज्जवला ओळखली जाते. उज्जवलाचे वडील पोलीस अधिकारी होते. तरुणपणातच तिने मॉडेडिंगच्या करिअरची सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने 'फेमिना मिस इंडिया' या फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि 'फेमिना लुक ऑफ द ईयर' हा पुरस्कार जिंकला. तसेच 1996 मध्ये तिने फ्रान्समधील एलीट मॉडल लूक स्पर्धेत भाग घेत 'टॉप 15'मध्ये स्थान पटकावलं.


उज्जला राऊत नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय मॉडेल होती. तिने यवेस सेंट-लॉरेंट, रॉबर्टो कैवल्ली, ह्यूगो बॉस, डोल्स आणि गब्बाना, गुच्ची, गिवेंची, वैलेंटिनो, ऑस्कर डे ला रेंटा आणि एमिलियो पक्की सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय डिझायनर्ससाठी काम केलं आहे. विक्टोरिया सीक्रेट फॅशन शोमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय होती. 2002 आणि 2003 मध्ये तिने या शोमध्ये भाग घेतला. 2012 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. एमटीव्हीच्या सुपरमॉडल ऑफ इयर या स्पर्धेचं तिने परिक्षण केलं होतं. उज्जवलाने 2004 मध्ये स्कॉटिश सिने-निर्माता मैक्सवेल स्टेरीसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि 2011 मध्ये ते विभक्त झाले. 


संबंधित बातम्या


ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो