Rajinikanth Lal Salaam Movie Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या आगामी 'लाल सलाम' (Lal Salaam) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. लक्षवेधी पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून आता या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 


'लाल सलाम'मध्ये झळकणार रजनीकांत


रजनीकांत यांच्या आगामी 'लाल सलाम' या सिनेमाची घोषणा झाली असून आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. 'लाल सलाम' या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये रजनीकांत या किलर लूक पाहायला मिळत आहे. काळा चष्मा, भेदक नजर असा काहीसा रजनीकांत यांचा लूक आहे.  






'या' दिवशी प्रदर्शित होणार 'लाल सलाम' (Lal Salaam Release Date)


'लाल सलाम' हा सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोंगलच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे 2024 मध्येही बॉक्स ऑफिसवर रजनीकांत यांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. 'लाल सलाम' या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने केलं आहे. हा तामिळ सिनेमा आहे. या सिनेमात विष्णु विशाल आणि विक्रांत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


ऐश्वर्या रजनीकांतने 'लाल सलाम' या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. पण आता येत्या काही दिवसांत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे जगभरातील रजनीकांत यांचे चाहते त्याच्या लाडक्या थलायवाचा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जातील. ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टरवर चाहते या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं कमेंट्स करत सांगत आहेत. 


'लाल सलाम' हा सिनेमा तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा दणदणीत कमाई केली. आता 'लाल सलाम' हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


संबंधित बातम्या


Rajinikanth : काळा चष्मा, लाल टोपी... रजनीकांतचा 'Laal Salaam'मधील लक्षवेधी लूक