Rasha Thandani Debut: अभिनेत्री  रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thandani)  ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राशानं काही दिवसांपूर्वी स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता राशा ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

  


राम चरणसोबत स्क्रिन शेअर करणार राशा


राशा ही तिच्या पहिल्या चित्रपटात साऊथ स्टार राम चरणसोबत (Ram Charan) स्क्रिन शेअर करणार आहे, असं म्हटलं जात आहे. राशा ही एका  तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात राशा ही राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.  रिपोर्टनुसार, राशाने या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले आहे आणि तिला या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल देखील करण्यात आले आहे.


चित्रपटाचे बजेट 300 कोटी


रिपोर्टनुसार,  राम चरण आणि राशा यांच्या या चित्रपटाची निर्मिती 300 कोटी रुपयांमध्ये केली जाणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबू सना करणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असणार आहे. पण, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण  निर्माते लवकरच या चित्रपटाची घोषणा करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.


राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत असते. राशाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.






 रवीनाच्या  'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिच्या मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीना प्रमाणेच आता तिची लेक देखील अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. त्यामुळे आता राशाच्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.






इतर महत्वाच्या बातम्या:


Raveena Tandon: रवीना टंडनची मुलगी राशा झाली स्कूल ग्रॅज्युएट; अभिनेत्रीनं खास फोटो शेअर करून व्यक्त केला आनंद