Laal Singh Chaddha On Oscar Page : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’चा (Forest Gump) हिंदी रिमेक आहे. या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. रिलीजनंतरदेखील हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. दुसरीकडे या सिनेमाला ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर स्थान मिळाले आहे. 


'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंपचा' रिमेक आहे. त्यामुळे 'फॉरेस्ट गंप' आणि 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमातील काही दृश्यांचा व्हिडीओ 'द अकॅडमी' (The Academy) या ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे. 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाला ऑस्करमध्ये 13 नामांकन मिळाली होती. तर सहा ऑस्कर पुरस्कार या सिनेमाने आपल्या नावे कोरली होती. 






'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 12 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या रक्षा बंधनची टक्कर होत आहे. 


'लाल सिंह चड्ढा'मध्ये शाहरुखची झलक


रिपोर्टनुसार, शाहरुख आणि आमिरने मन्नतमध्ये 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा पाहिला आणि सिनेमावर चर्चा केली. 'लाल सिंह चड्ढा' आधीदेखील आमिरने अनेक सिनेमे रिलीज होण्याआधी शाहरुखला दाखवले आहेत. आमिर शाहरुखचा नेहमीच आदर करताना दिसतो. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुखची झलक पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर शाहरुखने केलं आमिरचं कौतुक; मन्नतमध्ये केलं होतं खास स्क्रीनिंग


Laal Singh Chaddha Box Office Collection: 'लाल सिंह चड्ढा'च्या कमाईचा आकडा घसरला! पाहा दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन