Kushi Box Office Collection Day 2:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा  'खुशी' (Kushi) हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या  चित्रपटात विजय आणि समंथा यांची जबरदस्त केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 15.25 कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...


'समंथा' दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई


समंथा  आणि विजयच्या  'खुशी' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनया चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. विजय आणि सामंथा  यांच्या खुशी या रोमँटिक चित्रपटाने शनिवारी  9.90 कोटींची कमाई केली आहे. आता रविवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.






प्रेक्षकांना आवडली समंथा आणि विजयची जोडी


खुशी या चित्रपटातील समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि विजय (Vijay Deverakonda) यांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच या चित्रपटामधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. खुशी या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'कुशी' हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 


खुशी या चित्रपटात समंथा आणि विजय यांच्यासोबतच  सचिन खेडेकर (Sachin Khedekar),मुरली शर्मा,वेनेला किशोर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन खुशी या चित्रपटामधील सीन्सचं कौतुक केलं आहे. खुशी  या चित्रपटाच्या माध्यमातून समंथा आणि विजय यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली आहे.


काही महिन्यांपूर्वी समंथाचा  'शकुंतलम' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसली नाही. तर विजयचा लायगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता या दोघांच्या खुशी  या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Kushi Review : विजय देवरकोंडा आणि समंथाचा 'खुशी' कसा आहे? वाचा रिव्ह्यू