बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू दगडफेकीत जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2016 10:58 AM (IST)
NEXT
PREV
मुंबई : बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू सध्या त्याच्या अपकमिंग अल्बम 'सांवरे' साठी लखनऊमध्ये आहे. या अल्बमच्या चित्रीकरणादरम्यान एका जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
लखनऊमधील इमामबाडे येथे कुणाल खेमूच्या अपकमिंग अल्बमचे शुटींग सुरु आहे. या अल्बममध्ये कुणाल खेमू सोबत मिस इंडीया ग्रॅण्ड इंटरनॅशनल २०१५ मधील वर्तिका सिंहदेखील आहे. इमामबाडे येथे शुटींग करण्याने काहींच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने त्याला विरोध होत होता.
त्यामुळे शुटींगदरम्यान एका संतप्त जमावाने सर्व टीमवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात कुणाल खेमू गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातांना दुखापत झाली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -