नवी दिल्ली : केआरके अर्थात कमाल आर खान चर्चेत राहण्यासाठी बॉलिवूडमधील वेगवेगळे कलाकार शोधतच असतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या केआरकेने आपला मोर्चा ज्युनिअर बच्चनकडे वळवला आहे.


 
आगाऊपणे इतरांच्या खाजगी आयुष्यावर कमेंट करणारा, किंबहुना नाक खुपसणारा अशी ख्याती असलेल्या कमाल खानने '2007 मधला गुरु हा सिनेमा अभिषेक बच्चनचा अखेरचा सोलो हिट होता. जर मी चुकत असेन तर मला सांगा' असा ट्वीट केला.

 

https://twitter.com/kamaalrkhan/status/734388252669530113

 
यावर उत्तर देताना अभिषेकने तुम्ही चुकल्याचं म्हटलं. या सिनेमात माझ्याशिवाय मिथुन चक्रवर्ती, आर माधवन, विद्या बालन, ऐश्वर्या राय यासारखे दिग्गज कलाकार होते. त्यामुळे तो माझा सोलो हिट नव्हता, असं तिरकस उत्तर दिलं.

 

https://twitter.com/kamaalrkhan/status/734393782586724352

 
त्यानंतरही केआरकेने 'तुम्ही आणि ऐश्वर्या त्यावेळी मोठे कलाकार होतात, इतर जण तर फक्त जागा भरायला होते.' असं म्हटलं. हा ट्विटरवॉर थांबवण्यासाठी अभिषेकने 'तुमच्याशी असहमत व्हायला मला आवडेल. दुबईत एन्जॉय करा' असं म्हणत काढता पाय घेतला.
काहीच महिन्यांपूर्वी ट्विटरवर अभिषेकचा एक ट्विटरवॉर रंगला होता. अभिषेक हा स्टारच नसल्याचा दावा एकाने केला, त्यावेळी केआरके अभिषेकची बाजू घेण्यासाठी आला होता.