Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या (Koffee With Karan 8) नुकत्याच पार पडलेल्या भागात जीनत अमान (Zeenat Aman) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) सहभागी झाल्या होत्या. दरम्यान नीतू कपूर ऋषी (Rishi Kapoor) यांच्या आठवणीत रमल्या. ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलिवूडमधील गोड जोडपं होतं. करिअरसह वैयक्तिक आयुष्यातही दोघे यशस्वी झाले. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. 


'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर नीतू कपूर आणि जीनत अमान यांनी करण जोहरसोबत करिअर ते वैयक्तिक आयुष्य अशा वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. दरम्यान करिअरच्या सुरुवातीबद्दल बोलताना नीतू कपूर म्हणाल्या,"आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. यश चोप्राच्या उपस्थितीत आम्ही दररोज पार्टी करतो. एकत्र अंताक्षरीदेखील खेळतो. खूप मजेशीर दिवस होते".


ऋषी कपूर खाष्ट बॉयफ्रेंड होता : नीतू कपूर


लग्नाआधीचा एक किस्सा शेअर करत नीतू कपूर म्हणाल्या,"बॉयफ्रेंड म्हणून ऋषी कपूर खूपच खाष्ट होता. माझं पार्टी करणं ऋषीने थांबवलं होतं. मी काय करायचं, काय नाही , एखादी गोष्ट करायची की नाही, अशी प्रत्येक गोष्टीत तो पडायचा. त्यामुळे मोठ्या पार्ट्यांमध्ये मी कधीही हजेरी लावली नाही. माझी आईदेखील खूप खाष्ट होती. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी दोन खाष्ट व्यक्ती पाहिले आहेत". 




ऋषी कपूर आणि नीतू कपूर 1980 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर नीतू या मनोरंजनसृष्टीपासून दूर गेल्या. संसार करण्यासाठी नीतू यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2022 मध्ये वरुण धवन आणि कियारा आडवाणी अभिनीत जुग जुग जियो या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मिस्टर खन्ना या सिनेमात त्या लवकरच झळकणार आहेत. या सिनेमात सनी कौशल आणि श्रद्धा श्रीनाथ मुख्य भूमिकेत आहेत. 


ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची पहिली भेट 'जहरीला इंसान'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी नीतू कपूर या फक्त 15 वर्षांची होत्या. इथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर प्रेम झाले. या जोडीला रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर असे दोन अपत्ये आहेत. नीतू यांच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: सनी देओलबद्दल श्रीदेवींची लेक असं काही बोलली की करणही शॉक झाला